Homeताज्या बातम्याआळंदी-दिघी रस्त्यावर धक्कादायक घटना; मित्रानेच मित्राची गोळी झाडून हत्या

आळंदी-दिघी रस्त्यावर धक्कादायक घटना; मित्रानेच मित्राची गोळी झाडून हत्या

(आळंदी प्रतिनिधी रवी कदम )  आळंदी-दिघी रस्त्यावर धक्कादायक घटना; मित्रानेच मित्राची गोळी झाडून हत्या

आळंदी-दिघी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. अलंकापुरम चौकाजवळ मित्रानेच मित्राच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अलंकापुरम ९० फुटी रोडवरील ‘श्री साई रोड कॅरिअर’ कार्यालयाजवळ घडली. काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत तिघे मित्र बसलेले असताना अचानक वाद निर्माण झाला आणि त्यातून संशयित अमित जीवन पठारे (रा. पठार मळा) आणि विक्रांत ठाकूर (रा. सोलू खेड) यांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळीबार केला.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या नितीन गिलबिले यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, नितीन गिलबिले, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे तिघेही जिवलग मित्र होते. हे तिघे जमिनांच्या प्लॉटिंगच्या व्यवसायात एकत्र होते. व्यवसायातील व्यवहारांच्या वादातून ही घटना घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दिघी पोलीस स्टेशनतर्फे मोठी शोध मोहीम राबवली जात आहे. या प्रकरणातील संशयित अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर हे घटनेनंतर पसार झाले असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

या दोघांचा माग काढण्यासाठी दिघी पोलिसांनी विशेष अशी पाच पथके तयार केली आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून दोन्ही आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

0
बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

एमपीसीबीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 84 आरएमसी युनिट्सना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

0
पुणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 350 पैकी 84 रेडी मिक्स काँक्रिट (RMC) युनिट्सना बंद...

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 2.18 लाख मतांनी विजयी, राष्ट्रीय विक्रम; जवळच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 935...

0
सुनेत्रा 2.18L मतांनी विजयी, पक्षाला काम बोलू द्या असे सांगतात पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सोमवारी बारामती पोटनिवडणूक 2,18,034...

पीए ते मंत्र्याच्या पत्नीचा पतीवर जीवे मारण्याचा आरोप, गुन्हा दाखल

0
पुणे: कोरेगाव पार्क पोलिसांनी 30 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमधील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...

स्नायूंच्या नुकसानापासून ते चयापचयाच्या वाढीपर्यंत: फिटनेस आणि त्वचेचे आरोग्य पुन्हा परिभाषित करणारी एक नॉन-आक्रमक...

0
पुणे: GLP-1 वेट-लॉस इंजेक्शनने जागतिक स्तरावर ट्रॅक्शन मिळवल्यामुळे, सखोल स्नायू तयार करणे आणि त्वचा टोनिंगसाठी डिझाइन केलेले नवीन, नॉन-इनवेसिव्ह तंत्रज्ञान सादर करणारे पुणे हे...

Translate »
error: Content is protected !!