Homeताज्या बातम्यागोदावरीच्या छाताडावर वाळू माफियांचा घाला! बाणेगाव-सौंदल परिसरात अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या...

गोदावरीच्या छाताडावर वाळू माफियांचा घाला! बाणेगाव-सौंदल परिसरात अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बाणेगाव/सौंदल तालुका धनसावंगी प्रतिनिधी राहुल बोबडे )
गोदावरी नदीचे पात्र सध्या वाळू माफियांच्या विळख्यात सापडले असून बाणेगाव आणि सौंदल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दिवस-रात्र लेबर कामगार ट्रॅक्टर आणि डंपर सहाय्याने नदीपात्रातून वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात असून प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
नदीपात्राचे विद्रुपीकरण; पर्यावरण धोक्यात
अवैधरित्या वाळू उपसल्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलत असून भूजल पातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
रात्रंदिवस सुरू वाहतूक
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे ही वाळू विविध भागात पोहोचवली जात असून महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांचा संताप
“वाळूची वाहने खुलेआम गावातील रस्त्यांवरून धावत आहेत. तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. उलट प्रश्न विचारणाऱ्यांनाच दमदाटी केली जाते,” असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
गोदावरी नदीचे अस्तित्व वाचवण्यासाठी आणि पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गोदावरी नदी वाचवायची की वाळू माफियांना मोकळे रान द्यायचे?
या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनानेच द्यावे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

0
सॅन फ्रान्सिस्को-आधारित स्टार्टअप फाउंडेशनने विकसित केलेला Phantom Mk1 रोबोट, यूएस लष्करी मूल्यमापनासाठी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात आला तेव्हा इतिहासातील पहिले ह्युमनॉइड मशीन...

चेतन चौधरीने दुकानात ‘फोन सोडला’, कर्मचाऱ्याचे उपकरण घेऊन गेला: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचे काय...

0
पुणे: 25 वर्षीय पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी चेतन चौधरी याने घटनेच्या...

अबंड”ज्ञानराधा ठेवीदारांचा एल्गार! मनोज जरांगे पाटील मैदानात; ‘एकही ठेवीदार खचू नका, न्याय मिळवून देणार!’”

0
अभंग जालना जिल्हा प्रतिनिधी राहुल बोबडे) ज्ञानराधा ठेवीदारांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांची साथआत्महत्या नका करू, मी तुमच्या पाठीशी आहे" ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसह...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

0
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

‘कोठडीतील कबुलीजबाब पुरावा म्हणून मान्य नाही’: केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयलचे वकील

0
पुणे : केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी रविवारी असा युक्तिवाद केला की, पोलिस कोठडीत असताना दिलेली कोणतीही कबुली पुरावा...

Translate »
error: Content is protected !!