Homeताज्या बातम्याअबंड"ज्ञानराधा ठेवीदारांचा एल्गार! मनोज जरांगे पाटील मैदानात; ‘एकही ठेवीदार खचू नका, न्याय...

अबंड”ज्ञानराधा ठेवीदारांचा एल्गार! मनोज जरांगे पाटील मैदानात; ‘एकही ठेवीदार खचू नका, न्याय मिळवून देणार!’”

अभंग जालना जिल्हा प्रतिनिधी राहुल बोबडे) ज्ञानराधा ठेवीदारांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांची साथआत्महत्या नका करू, मी तुमच्या पाठीशी आहे”
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसह राज्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये अडकलेल्या हजारो ठेवीदारांच्या न्यायासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या संघर्षात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट ठेवीदार न्याय हक्क कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत त्यांनी ठेवीदारांना धीर देत, “मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.
अंबड येथे झालेल्या या बैठकीस राज्यभरातील शेकडो ठेवीदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुष्यभराची कमाई, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी साठवलेली रक्कम पतसंस्थांमध्ये अडकल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळल्याची व्यथा ठेवीदारांनी भावूक शब्दांत मांडली.
कृती समितीचे डॉ. लक्ष्मण भीमराव सावंत, रामेश्वर त्रिमुखे, सतीश कदम, संतोष जाधव, अशोक फालके, लक्ष्मण गोरे, सचिन उबाळे, आकाश सातपुते, लक्ष्मण खरात, बंडू खरात, अंबादास खोमणे, प्रकाश पालवे, ज्ञानेश्वर वाघ, अमरदीप घाटोळे, हरिभाऊ पीराने, जब्बार शेख यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी ठेवीदारांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांची सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “कोणत्याही ठेवीदाराने खचून जाऊ नये. आत्महत्या हा मार्ग नाही. तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. मी तुमच्या लढ्यात सोबत आहे.”
ठेवीदारांच्या प्रमुख मागण्या
कृती समितीने सादर केलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणातील सीआयडी तपासाला गती द्यावी.
जप्त मालमत्तेचा तातडीने लिलाव करून निधी ठेवीदारांना वितरित करावा.
शासन आणि प्रशासनावर दबाव निर्माण करून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा.
बैठकीनंतर ठेवीदारांमध्ये नव्याने आशेचा किरण निर्माण झाला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कडक
सीआयडी तपासाला गती, जप्त मालमत्तेचा लिलाव आणि ठेवी परत मिळवून देण्यासाठी ठेवीदारांच्या लढ्याला नवे बळ – मानव मित्र न्यूज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

0
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

‘कोठडीतील कबुलीजबाब पुरावा म्हणून मान्य नाही’: केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयलचे वकील

0
पुणे : केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी रविवारी असा युक्तिवाद केला की, पोलिस कोठडीत असताना दिलेली कोणतीही कबुली पुरावा...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

0
पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

Translate »
error: Content is protected !!