Homeताज्या बातम्यातीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. अनेक वर्षांपूर्वी पुनर्वसन व विविध प्रकल्पांच्या उद्देशाने सुमारे १०० शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. मात्र आजपर्यंत त्या जमिनींचा संबंधित प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी गेल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत. शासनाच्या जमीन संपादन व पुनर्वसन नियमांनुसार, संपादित जमीन मूळ उद्देशासाठी वापरली गेली नसेल तर ती जमीन मूळ धारकांना परत देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात संपादित जमिनींची तात्काळ चौकशी करून वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात, संबंधित शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी तसेच या प्रकरणी विशेष समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बातमी देणारे : शिवाभाऊ बोबडे, तीर्थपुरी शहर न्यूज प्रसारण रिपोर्टर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

Translate »
error: Content is protected !!