Homeताज्या बातम्यातीर्थपुरीत ऑनलाईन मटक्याचे जाळे; तरुणाई व्यसन आणि गुन्हेगारीच्या विळख्यात

तीर्थपुरीत ऑनलाईन मटक्याचे जाळे; तरुणाई व्यसन आणि गुन्हेगारीच्या विळख्यात

तालुका धनंसावगी प्रतिनिधी राहुल बोबडे
तीर्थपुरी शहरात सध्या अवैध ऑनलाईन मटका व्यवसायाने चिंताजनक स्वरूप धारण केले असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या जाळ्यात अडकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑनलाईन मटका घेतला जात असून या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उडान कॉलनी परिसरात काही टोळ्या संघटित पद्धतीने हा अवैध व्यवसाय चालवत आहेत. हैदराबाद, बंगळुरू, कर्नाटकसह विविध राज्यांतील लोकांकडून ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन आणि तरुण मुलं मोठ्या प्रमाणात या धंद्याकडे आकर्षित होत आहेत.
“शिक्षण घेऊन नोकरीत दहा हजार रुपये मिळवण्यापेक्षा ऑनलाईन मटक्यातून रोज दहा हजार रुपये कमावतो,” अशी मानसिकता काही तरुणांमध्ये वाढत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे शिक्षणापासून दूर जात असलेली तरुणाई व्यसन, गुंडागर्दी आणि अवैध मार्गांकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही युवकांकडे बेकायदेशीर हत्यारे आणि रिव्हॉल्व्हर आढळत असून शहरातील वातावरण भीतीदायक बनत चालले आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून विशेष पथक नेमावे, अशी मागणी केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत ऑनलाईन मटका रॅकेटवर मोठी मोहीम राबवावी, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करावी, अशी अपेक्षा तीर्थपुरीकर व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

0
पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये सेवानिवृत्त बँक अधिकारी 64L गमावले

0
पुणे: कोथरूड येथील एका 66 वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे 63.56 लाख रुपयांचे नुकसान सायबर चोरांनी त्याला गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान शेअर-ट्रेडिंगवर चांगले...

पुण्यातील पालखी मुक्काम पूर्ववत; भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच दोन दिवस विसावा

0
आळंदी देवाची,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे) आळंदी / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री...

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

0
पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम) Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल...

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात...

Translate »
error: Content is protected !!