पुणे 🙁 अशोक कुंभार प्रतिनिधी)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष मा. विनोद भाऊ सकट यांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सन्मानित केले.
एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विनोद सकट गेल्या दहा वर्षांपासून पक्ष संघटनेचे प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहेत.
दिनांक १० ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आलेल्या अजितदादा पवार यांनी मा. नगरसेवक सदानंद शेट्टी यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान विनोद सकट यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विनोद सकट यांचे मन भावनांनी गहिवरून आले.
सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल घेणारे अजितदादा पवार हे खरे अर्थाने कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते असल्याचे यावेळी पुन्हा एकदा दिसून आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांचे कट्टर कार्यकर्ते निलेश म्हैसने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























