Homeराजकीय*पुरोगामी संघर्ष परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार सासवड येथे पारधी समाजाच्या कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे...

*पुरोगामी संघर्ष परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार सासवड येथे पारधी समाजाच्या कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप!

(प्रतिनिधी अशोक कुंभार सासवड)
सासवड (पुरंदर) — सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पुरोगामी संघर्ष परिषद (PSP) यांच्या पुढाकारातून शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सासवड येथे पारधी समाजातील अनेक कुटुंबांना जातीचे दाखले (Caste Certificates) वाटप करण्यात आले.
हा उपक्रम भोर–पुरंदरच्या प्रांताधिकारी सौ. वर्षा लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
🌿 सामाजिक परिवर्तनाची दिशा — पारधी समाज मुख्य प्रवाहात
पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी राज्यभर कार्यकर्त्यांना या उपक्रमासाठी मार्गदर्शन दिले आहे.
त्यांची भूमिका स्पष्ट —
✔ पारधी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे
✔ शासनाच्या सवलती मिळवून देण्यासाठी दाखले उपलब्ध करणे
✔ सन्मानाने जगण्याचा अधिकार मजबूत करणे
🔹 मनोज दादा भिसे यांचा विशेष पुढाकार
या उपक्रमात परिषदेचे युवक प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला.
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक पारधी कुटुंबांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
🎟️ लाभार्थ्यांना मिळाले नवे अधिकार
प्रांताधिकारी सौ. वर्षा लांडगे यांच्या हस्ते खालील लाभार्थ्यांना जात दाखले देण्यात आले—
अतुल भोसले
अमोल भोसले
करुण भोसले
दुर्गा भोसले
ताराबाई भोसले
हरीश भोसले
इत्यादी कुटुंबे
या दाखल्यांमुळे त्यांना मिळणारे लाभ —
✔ शिक्षणातील आरक्षण
✔ रोजगाराच्या संधी
✔ विविध शासकीय योजना
✔ सामाजिक सुरक्षा
🔜 उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच दाखले
प्रांताधिकारी लांडगे यांच्याशी चर्चा करून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
उर्वरित वंचित कुटुंबांनाही लवकरच दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
** उपस्थित मान्यवर**
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उपस्थित होते —
वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ भिसे
पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष प्रा. पंढरीनाथ आढाळगे
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे
किशोर आढाळगे, अलंकार शेलार, भाऊसो साळुंखे
इत्यादी पदाधिकारी.
📢 संघर्ष परिषदेचे आवाहन
“ज्या व्यक्तींना अजूनही जातीचा दाखला मिळालेला नाही, त्यांनी तातडीने सासवड येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

0
पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

टँकरचालकांनी केली दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

0
पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

Translate »
error: Content is protected !!