Homeसामाजिकसोशल मीडियावरील व्हिडिओनंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई; स्वच्छतेसाठी जनजागृतीची गरज

सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई; स्वच्छतेसाठी जनजागृतीची गरज

आळंदी (संपादक रोहिदास कदम ) : तीर्थक्षेत्र आळंदी येथील बाह्यवळण मार्गावर साचलेल्या कचऱ्याचे साम्राज्य हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अखेर मोहीम हाती घेतली आहे. अस्वच्छतेबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत दुतर्फा स्वच्छतेचे काम सुरू केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा उचलण्याची मोहीम राबवली. साचलेला कचरा संकलित करून ट्रॅक्टर व ट्रकद्वारे पुढील विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिक व भाविकांना कचरा घंटागाडीतच देण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. आळंदी लगतच्या केळगाव व चऱ्होली खुर्द परिसरातील काही नागरिक बाह्यवळण मार्गावर कचरा टाकत असल्याची तक्रार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली होती. यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
जनजागृतीसाठी महत्त्वाचे मुद्दे :
जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, तसेच सार्वजनिक ठिकाणेही आपलीच जबाबदारी आहे, ही भावना प्रत्येकाने मनात ठेवणे आवश्यक आहे.
रस्त्यावर टाकलेला कचरा केवळ घाणच निर्माण करत नाही, तर तो रोगराईलाही आमंत्रण देतो.
प्लास्टिक, उरलेले अन्न आणि ओला कचरा वेगवेगळा करून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांनी “स्वच्छता हीच सेवा” मानून परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, याची जाणीव नागरिकांनी ठेवावी.
:
“माझे शहर – माझी जबाबदारी” ही भावना अंगीकारल्यासच आळंदी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राचे सौंदर्य टिकून राहील. प्रशासनाच्या कारवाईसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच खरी स्वच्छतेची गुरुकिल्ली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

फलकावर ‘कचरा टाकू नका’… पण प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य! केळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप”

0
बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

0
एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

0
फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

Translate »
error: Content is protected !!