Homeताज्या बातम्यासासवडमध्ये ग्रेट जेंगो सर्कसचे भव्य आयोजन; दररोज तीन खेळांतून थरारक मनोरंजन

सासवडमध्ये ग्रेट जेंगो सर्कसचे भव्य आयोजन; दररोज तीन खेळांतून थरारक मनोरंजन

प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड (ता. पुरंदर | जि. पुणे):
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात हडपसर रोड येथील हिवरकर मळा, भोंगळे पेट्रोल पंप समोर ग्रेट जेंगो सर्कस प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. दररोज तीन खेळांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १.००, ४.०० आणि सायंकाळी ७.०० वाजता सर्कसचे खेळ सुरु होत आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सन १९७८ साली सुरू झालेली ग्रेट जेंगो सर्कस ही महाराष्ट्रातील एकमेव मराठी सर्कस म्हणून ओळखली जाते. अनेक चढ-उतारांवर मात करत आजही ही सर्कस प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असून परंपरागत कलेची जपणूक करत आहे.
सद्यस्थितीत या सर्कसमध्ये ३५ कलाकार विविध कौशल्यपूर्ण खेळ सादर करत आहेत. यामध्ये चिंपांजीचे खेळ, फायर डान्स, हायस्पीड मोटार सायकल ‘मौत का कुआ’, इंडिया गॉट टॅलेंट विजेते मणिपुरी ग्रुपचे विशेष सादरीकरण, हुल्ला हूप रिंग डान्स, अरेबियन डान्स, तसेच तलवार स्टंट व रिंग डान्स अशा अनेक चित्तथरारक व मनोरंजक खेळांचा समावेश आहे.
लहान मुलांसाठी सर्कसमध्ये खास आकर्षण ठेवण्यात आले आहे. जोकरांचे विनोदी आणि हास्यप्रधान सादरीकरण, विविध खेळ तसेच आवडत्या कार्टून कॅरेक्टर्ससोबत सेल्फी काढण्याची संधी उपलब्ध असल्याने लहानग्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
आजच्या मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात सर्कससारखी पारंपरिक कला हळूहळू लोप पावत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी कुटुंबासह ग्रेट जेंगो सर्कसला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सर्कस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील दररोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद

0
पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

Translate »
error: Content is protected !!