<]आळंदी (ता.खेड, पुणे) : १७ सप्टेंबर "]मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून देऊ फाटा, आळंदी येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधवांनी मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी हैदराबाद संस्थानातील मराठवाडा हा तब्बल १३ महिने गुलामगिरीत होता. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमास शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे मराठा सेवक श्री. पांडुरंग आवारे-पाटील, उद्योजक श्री. दादासाहेब जाधव, श्री. सुरेश नाना झोंबाडे, श्री. दत्तात्रय राठोडे साहेब, श्री. सुनीलजी काकडे, श्री. संतोष हावडे, अॅड. महेश राजगुरु, श्री. अभिमान साबळे, श्री. कुलदीप जाधव, प्रा. श्रीकांत आचोळे सर, श्रीकांत काकडे, श्री. राजेंद्र गळधर, राहुल आवारे, वैभव नाईकवाडे, आदित्य चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























