Homeताज्या बातम्या                       ...

                                                       बालिका अत्याचार-हत्या प्रकरण : आरोपीची फाशीची शिक्षा रद्द.  

,(प्रतिनिधी अशोक कुंभार )                                                                                                                       आरोपीची फाशीची शिक्षा रद्द; प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश.

पुणे, दि. १४ : पुण्यातील सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या अत्यंत धक्कादायक प्रकरणात सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा Bombay High Court ने रद्द केली आहे. मात्र आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली नसून न्यायालयाने प्रकरणाची मर्यादित पुनःसुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणाचा पार्श्वभूमी

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात २०२२ मध्ये ही घटना घडली होती. घरासमोर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या मुलीला आरोपीने फूस लावून नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह आरोपीच्या घराजवळील झुडपांमध्ये आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.

या प्रकरणाची सुनावणी POCSO Court मध्ये झाली होती. सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोपी तेजस दळवी याला मार्च २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली आरोपीच्या आईलाही शिक्षा ठोठावण्यात आली होती.

हायकोर्टात आव्हान

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने Bombay High Court मध्ये अपील दाखल केले होते. या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने तपास आणि सुनावणी प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी झाल्याचे निदर्शनास आणले.

फाशीची शिक्षा रद्द होण्याची कारणे

हायकोर्टाच्या निरीक्षणानुसार –

प्रकरणातील रासायनिक विश्लेषण (CA) अहवाल सादर करणाऱ्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवली गेली नव्हती.

त्या तज्ज्ञांची उलटतपासणी (Cross Examination) आरोपीला करण्याची संधी मिळाली नव्हती.

आरोपीचे काही जबाब योग्य प्रक्रियेनुसार नोंदवले गेले नसल्याचे आढळले.

या कारणांमुळे न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवणे योग्य नसल्याचे सांगत खटल्याची मर्यादित पुनःसुनावणी करण्याचे आदेश दिले.

४ महिन्यांत अंतिम निर्णयाचे निर्देश

हायकोर्टाने प्रकरण पुन्हा सत्र न्यायालयाकडे पाठवत आवश्यक साक्षीदारांची पुन्हा चौकशी करून चार महिन्यांच्या आत अंतिम निकाल द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

समाजात संताप

या प्रकरणात आधी दिलेली फाशीची शिक्षा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असली तरी न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आरोपीची सुटका करण्यात आलेली नसून कायद्याची योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच प्रकरण पुन्हा चालवले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!