Homeताज्या बातम्यान्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन; महसूल संघटनांचा शासनाला थेट इशारा

न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन; महसूल संघटनांचा शासनाला थेट इशारा

(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) गौणखनिज प्रकरणातील अन्यायकारक विलंबन तात्काळ रद्द करा
नागपूर हिवाळी अधिवेशनात महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कारवाईविरोधात संताप**
पुणे / नागपूर, दि. 12 (प्रतिनिधी):
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शासनाकडून गौणखनिज प्रकरणात कोणतीही संधी न देता, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करत चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकारी यांना एका तर्फी विलंबित करण्यात आले, ही कारवाई अत्यंत अन्यायकारक व दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गौणखनिज उत्पादन नावात आढळून आलेल्या वस्तुस्थितीनुसार नियमानुसार कार्यवाही केली असून शासनाच्या महसुलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयांना आवश्यक वस्तुस्थिती अहवालही वेळेत सादर करण्यात आले होते.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार अवैध गोणखनिज उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेत. हे कर्तव्य बजावत असताना ग्राम महसूल अधिकारी ते उपविभाग अधिकारी स्तरावरील अधिकारी-कर्मचारी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना, रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून कारवाई करत असतात. या दरम्यान अनेक वेळा महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्लेही झाले आहेत.
अशा परिस्थितीत यापूर्वी वारंवार मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. उलटपक्षी, गोणखनिज चोरीच्या प्रकरणात महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी अन्यायकारक पद्धतीने करण्यात आलेले विलंबन तात्काळ रद्द करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विनाविलंब पूर्वपदावर पदस्थापना द्यावी, अशी कळकळीची मागणी अनाथ राज्य संघटनेच्या निर्देशानुसार
तहसील व नायब तहसीलदार संघटना,
महसूल कर्मचारी संघटना,
ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना,
वाहन चालक संघटना व
महसूल सेवक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच आजपासून सर्व महसूल अधिकारी-कर्मचारी सामायिक रर्जेवर (Mass Casual Leave) जात असल्याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर
तहसील कार्यालय, पुणे येथील सर्व महसूल कर्मचारी,
प्रकाश विश्वनाथ धानेपकर (महसूल अधिकारी),
श्रीमती सुनिता सुखदेव वनवे (सहाय्यक महसूल अधिकारी)
यांच्या सह्या असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकामानंतर दुरूस्ती न झालेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती

0
खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि...

Translate »
error: Content is protected !!