Homeसामाजिकसासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होणार आहे. आषाढी वारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात सुमारे १२५ हून अधिक दिंड्या सहभागी होणार असून तब्बल १८० किलोमीटरचा तेरा दिवसांचा प्रवास पार पडणार आहे. भक्ती, परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम यंदाच्या वारीत अनुभवायला मिळणार असल्याची माहिती प्रमुख त्रिगुणी गोसावी यांनी दिली.
यंदाच्या वारीसाठी प्रशासन आणि स्थानिक संस्थांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य सेवा तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वारकरी भक्तांना सुरक्षित, सुसज्ज आणि सुखकर वारीचा अनुभव मिळणार आहे.
वारीतील प्रमुख धार्मिक सोहळ्यांमध्ये १५ जुलै रोजी वाघाळवाडी येथे पहिले रिंगण, १८ जुलै रोजी पिंपळी येथे गोल रिंगण आणि १३ जुलै रोजी वाखरी येथे भव्य उभे रिंगण पार पडणार आहे. तसेच १३ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांची पारंपरिक बंधू भेट हा सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरणार आहे.
१४ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन ४ ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा सासवडमध्ये आगमन करणार आहे.
वारीमुळे स्थानिक व्यापार, लघुउद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून “स्वच्छ सासवड, सुंदर सासवड” या संकल्पनेतून पर्यावरणपूरक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. सासवडच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा पालखी सोहळा ठरणार असल्याची भावना वारकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

धक्कादायक! आयुष्मान आरोग्य मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात, रुग्णांचे आरोग्य धोक्यात!

0
तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना राहुल बोबडे 'आरोग्य हीच परम संपत्ती' असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथील आयुष्मान...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

0
पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

‘केतनला न्याय’: लोहगड हत्येचा तपास सुरू असताना पुणेकरांनी काढला कँडल मार्च

0
लोढा बेलमोंडो येथील रहिवाशांनी रिअल्टर केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी कँडल मार्च काढला. पुणे: पुण्यातील लोढा बेलमोंडो टाउनशिपमधील रहिवाशांनी रिअल्टर केतन...

Translate »
error: Content is protected !!