Homeताज्या बातम्याधक्कादायक! आयुष्मान आरोग्य मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात, रुग्णांचे आरोग्य धोक्यात!

धक्कादायक! आयुष्मान आरोग्य मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात, रुग्णांचे आरोग्य धोक्यात!

तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना राहुल बोबडे
‘आरोग्य हीच परम संपत्ती’ असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथील आयुष्मान आरोग्य मंदिराच्या परिसरात सध्या अस्वच्छतेचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. दवाखान्याच्या आवारात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि साचलेल्या पाण्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दवाखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच परिसरात ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा, वैद्यकीय कचरा व इतर घाण साचलेली दिसून येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, हे आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, एकीकडे शासन स्वच्छता अभियान, आयुष्मान भारत योजना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्राची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत आदर्श ठरत असताना तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात अशी परिस्थिती असणे खेदजनक आहे.
मागणी:
संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.
Manav Mitra news YouTube channel advance information channel like and share

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

0
पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

‘केतनला न्याय’: लोहगड हत्येचा तपास सुरू असताना पुणेकरांनी काढला कँडल मार्च

0
लोढा बेलमोंडो येथील रहिवाशांनी रिअल्टर केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी कँडल मार्च काढला. पुणे: पुण्यातील लोढा बेलमोंडो टाउनशिपमधील रहिवाशांनी रिअल्टर केतन...

श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा तुळापूर दौरा संपन्न

0
४० बालवारकऱ्यांनी घेतले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीचे दर्शन तुळापूर (प्रतिनिधी – सचिन शिंदे): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

0
केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

Translate »
error: Content is protected !!