आळंदी /. (प्रतिनिधी : अशोक कुंभार)
आळंदी शहरातील शिवसेना (उबाठा गट) विभाग प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते तसेच आळंदी पंचक्रोशी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक बबन कदम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे. ते अरुणा उर्फ ताई माऊली महाराज लोखंडे यांचे बंधू होते. तसेच शिवसेना आळंदी देहू फाटा शाखा प्रमुख रोहिदास कदम यांचेही ते भाऊ होते.
युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशोक कदम यांनी सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता इंद्रायणी घाट, आळंदी येथे करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
अशोक कदम यांच्या निधनामुळे आळंदी परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























