Homeताज्या बातम्यापिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार; १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार; १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी योगेश भाऊ भोसले पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. आज मुंबईत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पक्षांतील एकूण १५ माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. या घडामोडीमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपकडून करण्यात येणाऱ्या या प्रवेश सोहळ्यात अजित पवार गटातील माजी महापौरांचा मुलगा, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौर तसेच अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट व शरद पवार गटातील काही नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने महाविकास आघाडी व राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख नेते पुढीलप्रमाणे :
संजोग वाघेरे – शहराध्यक्ष, ठाकरे गट
उषा वाघेरे – माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट
प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर, अजित पवार गट
प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती, अजित पवार गट
नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (शरद पवार गट)
राजू मिसाळ – माजी उपमहापौर, अजित पवार गट
समीर मासुळकर – माजी नगरसेवक, अजित पवार गट
रवी लांडगे – भाजपचे माजी नगरसेवक (सध्या ठाकरे गट)
जालिंदर शिंदे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
अमित गावडे – माजी नगरसेवक, ठाकरे गट
संजय काटे – माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते
मीनल यादव – माजी नगरसेविका, ठाकरे गट
कुशाग्र कदम – माजी महापौर मंगला कदम यांचे सुपुत्र
प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक, अजित पवार गट
विनोद नढे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
या नेत्यांचा प्रवेश भाजपसाठी मोठी ताकद मानली जात असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये आपली संघटनात्मक पकड अधिक मजबूत केल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, अजित पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, पक्षातील नाराजी आणि गळती पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आज मुंबईत होणाऱ्या या प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी योगेश भोसले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात

0
NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, पण मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात

0
कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

0
पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

पीएमसी पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने पाणी नाल्यात वाहून, रहिवाशांनी व्यक्त केला संताप आणि संताप |...

0
या प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदाराकडून प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे. ही पाईपलाईन शहराच्या समन्यायी पाणीपुरवठा योजनेचा भाग असून ती अलीकडेच संत तुकाराम पादुका चौकाजवळील विद्यमान...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

0
मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

Translate »
error: Content is protected !!