Homeताज्या बातम्याचार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार — तोंडावर दगडाने ठेचून निर्घृण हत्या; परिसरात संतापाचा...

चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार — तोंडावर दगडाने ठेचून निर्घृण हत्या; परिसरात संतापाचा ज्वालामुखी फुटला

डोंगराळे (ता. माळेगाव) येथे चार वर्षांच्या निरागस चिमुकलीवर बलात्कार करून तिच्या तोंडावर दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर थरकापून गेला असून गावकऱ्यांत भयंकर संताप उसळला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुकली एकटी असताना नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा लपवण्यासाठी तिच्या तोंडावर मोठा दगड टाकून ठेचून निर्दयीपणे तिचा जीव घेतला. मृतदेहाची अवस्था पाहून गावकरी संतप्त झाले.

गावकऱ्यांचा एकच स्वर —

“अशा पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला कोणतीही दया न ठेवता फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे!”

स्थानिकांनी सांगितले,

“चार वर्षांच्या लेकराचे काय चुकले होते? तिचा आत्मा काय म्हणत असेल… विचार करूनही अंगावर काटा येतो.”

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हृदयद्रावक घटनेने डोंगराळे व आसपासच्या परिसरात भीती, शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी तत्काळ न्याय मिळावा, अशी मागणी तीव्र केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

0
नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

0
पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

चक्रीवादळ, वादळाचा अंदाज धारदार करण्यासाठी आयआयटीएमने विझागमध्ये किनारपट्टीची चाचणी केली आहे

0
पुणे: देशातील किनारपट्टी हवामान निरीक्षण आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) विझाग येथील आंध्र विद्यापीठात कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड (सी-एआरटी)...

Translate »
error: Content is protected !!