Homeताज्या बातम्याआळंदी–नगर रोड व इंद्रायणी पुलाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

आळंदी–नगर रोड व इंद्रायणी पुलाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

,(आळंदी प्रतिनिधी रविदास कदम   आळंदी–नगर रोड व इंद्रायणी पुलाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला 🚧🚩
आळंदी : पावसाळा जवळ येत असताना आळंदी ते नगर रोड तसेच इंद्रायणी नदी पुलाच्या कामाला अद्याप गती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी सुमारे 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल 20 महिने उलटूनही रस्त्याची दुरुस्ती अपूर्णच असून अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय झाल्याची तक्रार करण्यात येत आहे.
धानोरे फाटा ते सोळू गाव दरम्यान सकलादिबाबा मंदिराजवळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. पुढे मरकळ–तुळापूर मार्गावरही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून गेल्या दहा वर्षांपासून खड्ड्यांची समस्या कायम आहे. इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे कामही दोन वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही.

रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून वारंवार अपघात घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हजारो भाविक या रस्त्याने माऊलींच्या दर्शनासाठी ये-जा करतात. नगर मार्गे येणाऱ्या दिंड्या देखील याच मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याची खराब अवस्था आणि सुरू असलेल्या कामाच्या संथ गतीमुळे भाविकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाने तातडीने कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, तसेच नागरिकांना पर्यायी वळणावर जावे लागू नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. अन्यथा हे प्रकरण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री Nitin Gadkari यांच्यापर्यंत नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
समाजसेवक तथा महाराष्ट्र राज्य मान्य काळा भ्रष्टाचार निवारण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अण्णा राजे शिवले पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करून नागरिक व भाविकांना दिलासा द्यावा, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

Translate »
error: Content is protected !!