Homeताज्या बातम्याअसा संपतोय का मराठी माणूस?

असा संपतोय का मराठी माणूस?

मानव मित्र न्यूज संपादक रवी कदम
✍️ मराठी तरुण पिढीला आत्मचिंतनाचा संदेश
आज महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात फिरताना एक अस्वस्थ करणारे चित्र वारंवार समोर येते. कष्ट, शिक्षण, उद्योग आणि दूरदृष्टी याऐवजी काही ठराविक चुकीच्या सवयींमध्ये अडकलेला मराठी तरुण समाज स्वतःच्या अधोगतीला नकळत कारणीभूत ठरत आहे, अशी खंत अनेक जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.
दारू, दादागिरी, हफ्तेबाजी, बेकायदेशीर धंदे, राजकीय गुंडगिरी, तोडफोडीचे आंदोलन, वर्गणीवर अवलंबून असलेले सण-समारंभ, आमदार-खासदारांच्या दारात उभं राहून सहली काढण्याची मानसिकता – यालाच यश आणि शौर्य समजण्याची धोकादायक प्रवृत्ती समाजात वाढताना दिसते.
स्वतःची रिक्षा, टॅक्सी, वडापावची गाडी किंवा प्रॉपर्टी परप्रांतीयांना भाड्याने देऊन आपण केवळ दलालीवर समाधान मानतो; मात्र तेच परप्रांतीय हे उद्योग स्वतःच्या कष्टाने उभे करून पुढे जातात. आपण सोडून दिलेली मेहनतीची कामे ते स्वीकारतात, बचत करतात, मुलांच्या शिक्षणावर लक्ष देतात आणि भविष्य सुरक्षित करतात.
नोकरी लागल्यानंतर काम न करता वाद, शिवीगाळ, दमदाटी करून “भाई” म्हणून नाव कमावणे हे यशाचे मापदंड बनले आहेत का, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. गावठी हातभट्टी, मटका, गुटखा, गांजा, चरस यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांच्या आसपास फिरणे आणि अंगावर पोलीस केसेस करून घेणे यालाच धाडस समजले जात आहे.
या सगळ्यात खरी शोकांतिका अशी की, जर या सर्व गोष्टी करून वेळ उरला तरच प्रगतीचा विचार केला जातो. परिणामी समाज मागे पडतो, आणि दोष मात्र परप्रांतीयांवर ढकलला जातो. पण प्रश्न असा आहे की, मेहनत, शिस्त आणि भविष्याचा विचार करणाऱ्या माणसाला चुकीचे तरी कसे म्हणता येईल?
आज गरज आहे ती दोषारोपांची नाही, तर आत्मपरीक्षणाची.
मराठी तरुणांनी पुन्हा एकदा शिक्षण, कौशल्य, उद्योग, प्रामाणिक मेहनत आणि स्वाभिमान या मूल्यांकडे वळण्याची गरज आहे. राजकीय भाडे बनण्याऐवजी स्वतःचा मार्ग घडवला, तरच मराठी माणूस पुन्हा उभा राहू शकतो.
ही टीका नसून इशारा आहे.
आज बदललो नाही, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
– मराठी तरुण पिढीसाठी एक जागरूक संदेश

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील दररोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद

0
पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

Translate »
error: Content is protected !!