Homeताज्या बातम्यामाऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अलंकापुरीत प्रारंभ

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अलंकापुरीत प्रारंभ

🕉️

श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने धार्मिक प्रथांचा अनोखा संगम

आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ वर थंडीसह आचारसंहितेचे सावट

आळंदी (प्रतिनिधी 🙁 रविदास कदम )

आळंदी नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचा शुभारंभ आज हरिनामाच्या गजरात, श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने झाला. वेदमंत्रांच्या जयघोषात आणि वारकरी परंपरेच्या भक्तिभावात हा धार्मिक सोहळा पार पडला.

महाद्वारात पारंपरिक विधीनुसार श्री गुरु हैबतबाबा पायरीचे पूजन पुजारी अमोल गांधी आणि काका कुलकर्णी यांनी वेदमंत्र पठणासह केले. या पूजनात दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर आणि नववस्त्र अर्पण करून श्रींची आरती व पसायदान करण्यात आले.

या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आणि ऋषिकेश आरफळकर, तसेच आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉ. भावार्थ देखणे, राजेंद्र उमाप, विष्णू तापकीर, अर्जुन मेदनकर, मुख्याधिकारी माधव केंद्रे, भिमा नरके (पोलीस निरीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पायरी पूजनानंतर मंदिरात अभंग, भजन आणि हरीजागराचा निनाद घुमला. या निमित्ताने भाविक आणि वारकरींना महाप्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग, आळंदी स्वकाम सेवा मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांकडून पिण्याचे पाणी, खिचडी, आणि स्वच्छता सेवा पुरविण्यात येत आहे.

तसेच, संध्याकाळी वीणा मंडपात योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्या कीर्तन सेवा आणि रात्री हैबतबाबा पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर महाराज यांच्या हरीजागर सेवेने वातावरण भक्तिमय झाले.

दरम्यान, पंढरपूरहून श्री पांडुरंगरायांची पालखी आणि श्री संत नामदेवरायांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल झाला. शहरात हरिनाम गजरात मनाचे पालखी सोहळे आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

आळंदी नगरी भक्तिभावाने उजळली असून संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून हजारो वारकरी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात CJP कार्यकर्त्यावर बेकायदेशीर सभेचा गुन्हा दाखल

0
पुणे : डेक्कन जिमखाना पोलिसांनी सोमवारी झुरळ जनता पार्टी (सीजेपी) शी संबंधित 10 तरुणांवर बेकायदेशीर असेंब्लीचा गुन्हा दाखल केला जेव्हा ते जेएम...

जिल्ह्याला अधिक डेटा-एंट्री ऑपरेटरची गरज भासत आहे कारण मतदारांची गर्दी वाढत आहे

0
डेटा-एंट्री ऑपरेटरच्या कमतरतेमुळे पुण्यातील मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेला विलंब होत आहे. पुणे: पुणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) मध्ये डेटा-एंट्री ऑपरेटरची...

ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र रिटेंडर्सची मागणी काँग्रेसने केली, या निर्णयामुळे ५६७ कोटी रुपयांची...

0
पीएमसीमधील काँग्रेस नेते रामचंद्र कदम यांनी आरोप केला की देशभरात केवळ चार कंत्राटदार मिश्र कचऱ्याची प्रक्रिया हाताळतात आणि आपापसात करार विभाजित करण्यासाठी कार्टेल...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

0
पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

शिक्रापूर येथील गृहप्रकल्पातील चार एकर जमिनीचा लिलाव हायकोर्टाने रद्द केला; महारेरा वॉरंटच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी...

0
पुणे : महारेराने 2021 मध्ये जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या विरोधात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ऑरा सिटी गृहनिर्माण प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 4.42...

Translate »
error: Content is protected !!