📰 पुणेतील वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’
पुणे (रवि कदम): शिवकालीन इतिहासाशी नाळ जोडणारा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्यात आले असून यास केंद्र सरकारची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे वेल्हे तालुका आता अधिकृतपणे ‘राजगड’ नावाने ओळखला जाणार आहे.
स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेला साक्षीदार ठरलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या तालुक्याचे नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ही मागणी पूर्णत्वास गेली आहे.
या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आनंदाचा माहोल असून, शिवकालीन वारसा जपण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
👉 शिवसेना – महायुती सरकार शिवकालीन वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार या निर्णयातून झाला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























