Homeसामाजिकपरमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांचा ७८वा जन्मोत्सव राजस्थान पाली–सोजत येथे भक्तीमय वातावरणात...

परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांचा ७८वा जन्मोत्सव राजस्थान पाली–सोजत येथे भक्तीमय वातावरणात साजरा

पाली–सोजत (राजस्थान) | प्रतिनिधी.सचिन शिंदे/
परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांच्या ७८व्या जन्मोत्सवानिमित्त राजस्थानमधील पाली–सोजत येथे भव्य व दिव्य अशा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीमद् भागवत कथेचे विशेष आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
या धार्मिक सोहळ्याची सुरुवात १० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता
नवदुर्गा चंडी हवन व कलश यात्रेने करण्यात आली.
त्यानंतर १२ जानेवारी, सोमवार रोजी सकाळी ८ वाजता
पाली दरवाजा, श्री भुवनेश्वर धाम येथे श्रीमद् भागवत कथेचा भव्य प्रारंभ झाला.
ही श्रीमद् भागवत कथा १२ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडत असून, विविध संत-महात्म्यांच्या प्रवचनांनी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते २ या वेळेतही विशेष संत प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देशभरातील नामवंत संत-महात्म्यांची उपस्थिती लाभली असून त्यामध्ये
जगद्गुरु शंकराचार्य (कोचीपुरण),
परमपूज्य स्वामी श्री गुरु शरणानंद जी महाराज,
परमपूज्य स्वामी श्री अवधशानंद गिरीजी (जुना पीठ, हरिद्वार),
परमपूज्य योगगुरु श्री स्वामी रामदेव जी महाराज (हरिद्वार),
परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी श्री महेश आनंदपुरी जी महाराज (ओम आश्रम, तांडव),
तसेच परमपूज्य स्वामी चित् आनंद सरस्वती जी महाराज (ऋषिकेश)
यांची प्रवचनरूपी सेवा भाविकांना लाभत आहे.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्याला महाराष्ट्रातील रामकृष्ण हरी आश्रम, आळंदी देवाची येथील २६ वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हरिपाठ, भजन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची वारकरी परंपरा राजस्थानच्या भूमीत अनुभवायला मिळत आहे.
“राम कृष्ण हरी… जय जय राम कृष्ण हरी…”
या अखंड नामस्मरणाने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला असून, भक्ती, संस्कार आणि परंपरेचा हा अनोखा संगम पाली–सोजतकरांच्या मनात भक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे.
परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा भव्य-दिव्य धार्मिक सोहळा, पाली शहरात अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीचा अद्वितीय अनुभव देणारा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!