चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र असल्याने गेल्या काही महिन्यांत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरींचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे, पोलीस उपायुक्त बापू बांगार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत चोर अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेपाळ, पारनेर, जि. अहमदनगर) याचा शोध घेण्यात आला. तो चोरी केलेली मोटारसायकल नेत असताना पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने एकूण १५ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत एकूण ८ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे तसेच पथकातील अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
चाकण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील १६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























