Homeक्राईमनर्तकीवर खर्च करण्यासाठी चोरी; फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – 6 लाखांहून अधिक...

नर्तकीवर खर्च करण्यासाठी चोरी; फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – 6 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त

–( बातमीदार अशोक कुंभार)
फुरसुंगी – नर्तकीसोबत बैठका, नाच-गाण्याच्या कार्यक्रमांसाठी पैसे खर्च करण्याच्या हव्यासापोटी चोरी करणाऱ्या आरोपीकडून तब्बल ₹6,14,420 किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने फुरसुंगी पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये फुरसुंगी पोलिसांविषयी समाधान व्यक्त होत आहे.
होळकरवाडी येथील अभिजीत मधुकर पठारे यांच्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा क्र. 403/2025 भा. दं. सं. कलम 305, 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथकाने अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला होता.
तपासादरम्यान पो. हवलदार सागर वनवे (6493) व पो.अंमलदार अभिजीत टिळेकर (9220) यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल उत्तम पठारे (वय 39, रा. होळकरवाडी) याने चोरी केलेले सोने मोहम्मदवाडी, पुणे येथील एका ज्वेलर्सकडे विक्री केल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पथकाने आरोपीच्या घरी अचानक धडक दिली असता आरोपी मिळून आला. त्याला फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे आणून तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिली.
पूछताछदरम्यान आरोपीने नर्तकीसोबत बसण्यासाठी, नाच-गाण्याच्या कार्यक्रमांसाठी पैसे खर्च करण्याचा शौक असल्याने पैशांची गरज भासली आणि त्यातूनच चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागिने त्याने ज्वेलर्सकडे विकल्याचेही उघड झाले. विक्रीतून मिळालेल्या ₹30,000 रक्कमेचा वापर त्याने स्वतःच्या ऐय्याशीवर केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीकडून आणि ज्वेलर्सकडून मिळून एकूण ₹6,14,420 किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्याच्या पुराव्यासह जप्त केले आहेत.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल फिर्यादी, स्थानिक नागरिक आणि पत्रकारांनी फुरसुंगी पोलिसांचे कौतुक केले आहे.
ही कामगिरी खालील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :
डॉ. राजकुमार शिंदे – पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५
श्रीमती अनुराधा उदमले – सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग
अमोल मोरे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पो. स्टे.
राजेश खांडे – पोलीस निरीक्षक (गुन्हे)
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
पो. उपनिरीक्षक विष्णू देशमुख,
पो. उपनिरीक्षक महेश नलावडे,
पोहवा नितीन गायकवाड, सागर वनवे, श्रीनाथ जाधव, हरिदास कदम, सतीश काळे, महेश उबाळे,
पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत टिळेकर, बिबीशन कुंटेवाड, वैभव भोसले
— प्रतिनिधी निखिल आढाळगे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

0
पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

0
पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

0
पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

Translate »
error: Content is protected !!