(आळंदी प्रतिनिधी रविकदम)
जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, आळंदी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था, आळंदी वेशी वरील कचरा समस्या, विद्युत विभागातील समस्या, पार्किंग समस्या, सार्वजनिक आरोग्य सुविधा, वाढलेली वाहतूक कोंडी, इंद्रायणी प्रदुषण, दर्शनबारी समस्या, मंदिर परिसरातील व पायाभूत सुविधांचा अभाव अशा विविध तातडीच्या समस्या नागरीकांनी मांडल्या.
अनेक नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबाबतही प्रश्न विचारले.
आ.बाबाजी काळे यांनी सर्व मांडलेल्या तक्रारी व मागण्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्या. काही प्रश्नांवर त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तर काही मोठ्या प्रश्नांसाठी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.
“जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांची खरी गरज समजून घेणे हे माझे कर्तव्य आहे. निवडणुकीपुरतीच नाही तर सतत जनतेच्या सेवेत राहणे हाच माझा संकल्प आहे,” असे भावनिक उद्गार आमदार बाबाजी काळे यांनी या प्रसंगी काढले.
जनसंवाद कार्यक्रमाला बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, डि.डि.भोसले पाटील, सचिन गिलबिले, रमेश गोगावले, प्रशांत कुऱ्हाडे, अविनाश तापकीर, विलास कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, संदीप नाईकरे पाटील, आशिष गोगावले, मनोज पवार, अनिकेत डफळ, मंगेश तिताडे, नंदकुमार वडगांवकर, शशीराजे जाधव, अनिताताई झुजम तसेच स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जनतेच्या थेट संवादातून उभे राहिलेले मुद्दे निश्चितच सोडवले जातील, अशी खात्री या जनसंवाद अभियानातून नागरिकांमध्ये निर्माण झाली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























