आळंदी प्रतिनिधी सचिन शिंदे
दानपेटीतील १५ हजारांची रोकड लंपास ; आळंदी पोलिसांकडून आरोपी सेवकास तात्काळ अटक
तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मंदिरात एका सेवकानेच दानपेटीतील पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील दानपेटीतून पैसे काढून ते कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी असताना आरोपीने तब्बल तीन दिवस नजर चुकवत १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी सेवकास तात्काळ अटक केली आहे.
विशाल बाळू वारुळे (वय ३३, रा. चोविसावाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ गाव वारूळवाडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंदिरातील दानपेटीतील रोकड जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याने ही रक्कम अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास आळंदी पोलीस ठाणे करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























