📰 बातमीदार रवि कदम
आळंदीचा अधिपती धर्मराज गणपती मंडळ
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आळंदी देवाची (गावठाण) येथे धर्मराज गणपती मंडळाने यंदाही गणेशोत्सवात वेगळेपण जपत भव्य आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने गणरायाला अनोख्या रूपात सजवले असून यावर्षी बाप्पाचा देखावा ‘विनायकी अवतार’ या संकल्पनेवर आधारित आहे.
आळंदी गावात आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये धर्मराज गणपती मंडळ आपली वेगळी ओळख टिकवून ठेवत असून, ‘धर्मराज पॅटर्न’ या नावाने मंडळाला विशेष ओळख मिळाली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
✨ धर्मराज सार्वजनिक गणेश मंडळ, आळंदी देवाची – भक्तांसाठी दरवर्षी आकर्षण ठरणारे केंद्र!

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























