Homeताज्या बातम्यासातारा एसटी विभागात मोठी कारवाई ; तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित

सातारा एसटी विभागात मोठी कारवाई ; तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित

पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) सातारा एसटी विभागात मोठी कारवाई ; तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या सातारा विभागात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून कर्तव्यात हलगर्जीपणा आणि कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण एसटी विभागात खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय यंत्र अभियंता विकास माने, विभागीय सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे आणि विभागीय भांडार अधिकारी सचिन गायकवाड यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र कदम यांनी ८ आणि ९ मे रोजी सातारा जिल्ह्यातील शिरवळ आणि पाटण आगारांना अचानक भेट दिली होती. या तपासणीदरम्यान आगारातील कामकाजात अनेक त्रुटी आणि आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या. त्याचा सविस्तर अहवाल कार्यकारी व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आला होता.
तपासणीदरम्यान दोन्ही आगारातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी विभागीय सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच अचानक भेटीच्या वेळी विभागीय यंत्र अभियंता विकास माने आणि भांडार अधिकारी सचिन गायकवाड हे अनुपस्थित आढळल्याने त्यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या घटनेमुळे सातारा एसटी विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील काळात आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसह प्रशासनातील शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत बेकायदेशीर बैठक बांधकाम पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल

0
बातमी रोहिदास कदम आळंदी-देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे बेकायदेशीर राजकीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...

रविवारी थंड, परंतु या आठवड्यात दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी ढगांचे आवरण

0
दिवेआगर *** उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताच दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी, मे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली - उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आल्याने,...

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी सुनील लोणकर यांचा सासवडमध्ये गौरव

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) सुनील पांडुरंग लोणकर यांना आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा पत्रकार पुरस्कार प्रदान...

बालेवाडीची हाक : वाहतुकीचे सर्वेक्षण, मग पूल खुला

0
पुणे: शहरामधील विकास आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे जात आहेत, बहुतेक वेळा त्यांच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय नुकसान होत नाही.रहिवासी वारंवार निदर्शनास आणून देत...

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभाग समन्वय समितीवर श्री. मेमाणे साधू सर यांची निवड

0
पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) पांगारे : रयत शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. मेमाणे साधू गुलाब यांची...

Translate »
error: Content is protected !!