,( पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )
साकुर्डे : साकुर्डे गाव व साकुर्डे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी आनंदाची बातमी असून, यावर्षी गावातील पारंपरिक हरी नाम सप्ताहाचा शुभारंभ गुरुवार दि. 9 रोजी होणार आहे.
या सप्ताहाच्या प्रारंभी गावातील वयाची 80 वर्षे पूर्ण करून आजही 95 ते 100 वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगणाऱ्या 21 ज्येष्ठ तपस्वींच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन व वीणा पूजन करण्यात येणार आहे. या ज्येष्ठांनी आपल्या पुढील पिढीला आदर्श घडविण्यासाठी केलेल्या योगदानाचा गौरव यावेळी केला जाणार आहे.
तसेच हरी नाम सप्ताहासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तन, मन आणि धनाने योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
तरी गावातील सर्व वडीलधारी, माता-भगिनी तसेच तरुण मित्रांनी सकाळी साडेआठ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सायंकाळी प्रकाश ब. जाधव व राजमुद्रा गणेश उत्सव मंडळ, मोरदरा यांच्या वतीने गाव व पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन रात्री 8 वाजता करण्यात आले आहे. तसेच कीर्तनाचा लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, भगवत सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले असून, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या मार्गे विश्रांतीसाठी थांबत असल्यामुळे या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























