(ता.पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या शुभहस्ते पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भारत भूषण अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांमध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप, आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध पंच मनोहर ताथवडकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी सुधीर शेलार, तसेच रिपब्लिकन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले नामदेव नेटके यांचा समावेश आहे. या सर्व मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिषदेचे प्रदेश युवक अध्यक्ष मनोज भिसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सल्लागार समितीचे पंढरीनाथ आढागळे, पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष गोकुळ भिसे, सामाजिक कार्यकर्ते संदीप भोंडे, दिलीप बागव (सासवड शहर अध्यक्ष), सचिन भोंडे महाराज (सासवड शहर वरिष्ठ अध्यक्ष), राजाभाऊ भोंडे महाराज, किशोर आढागळे (जिल्हा संपर्कप्रमुख) आणि जीवन शेंडकर यांच्या हस्ते विष्णूदादा भोसले, सुनील जगताप व सुधीर शेलार यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहात व अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























