Homeताज्या बातम्याअखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

मरकळला अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय सांगता
आळंदी (रोहिदास कदम) : आळंदी पंचक्रोशीत, विशेषतः मरकळ परिसरात, श्री दत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दत्तभक्त ताई माऊली महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिनाम गजर, कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांनी झाली.
सांगता सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी सुस्वर, हृदयस्पर्शी कीर्तन सेवा सादर केली. या निमित्ताने आळंदी परिसरातील विविध दत्त मंदिरांमध्ये भव्य पुष्पसजावट करण्यात आली होती. भाविक, वारकरी, ग्रामस्थांची श्रींच्या दर्शनासाठी व कीर्तनासाठी मोठी गर्दी झाली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
काल्याच्या कीर्तनानंतर पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या वतीने महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मरकळ पंचक्रोशीतील असंख्य दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संपूर्ण सप्ताहभर होम-हवन, यज्ञ, कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, हरिपाठ, गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, भजनसेवा, हरीजागर आदी धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात पार पडले.
यावेळी ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व श्रद्धाताई पांचाळ, अनुजा ननवरे व गुरुप्रसाद शिवशेहे यांनी केले. गुरुचरित्र पारायणाचे नेतृत्व गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी केले. क्षेत्रपाध्ये वामन काका मरकळे यांनी पौरोहित्य करीत दत्तयज्ञ, लघुरुद्र, दत्तयाग आदी विधी वेदमंत्रांच्या जयघोषात संपन्न केले.
कीर्तन सेवेत भाऊसाहेब महाराज यादव, भक्ती दीदी पांचाळ, दत्तात्रय महाराज माशेरे, गजानन महाराज गारडे, बाळासाहेब महाराज शेवाळे, एकनाथ महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज सुरतकर यांच्यासह गोरक्षनाथ महाराज वर्पे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
संगीत भजन सेवेत इंद्रायणी, जोगेश्वरी महिला, गडकर महिला, साई महिला, कानिफनाथ, भानोबा, वाघजाई महिला, नागेश्वर भजन मंडळांनी सहभाग नोंदवला.
अन्नदान सेवेत अर्जुन वाकचौरे, बबन पवळे, राहुल वागस्कर, मारुती आरदाळकर, पंडित बिरासदार, कैलास होले, दत्ताभाऊ थिटे, रोहिदास कदम, विजय लबडे, गोरक्ष दरेकर, रामदास साकोरे, किरण साकोरे, दाते, भोसले, कातोरे यांच्यासह अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले.
या भक्तीमय सोहळ्याचे आयोजन ताई माऊली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मरकळ ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचलिंग श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठान व सर्व सहकार्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!