प्रतिनिधी (निखिल आढाळगे)
घोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) – भारतीय जनता पार्टीचे नेते व उद्योजक रामचंद्र मामा देवकर यांच्या कन्या सौ. सोनाली दत्तात्रय मातेरे यांची घोटावडे गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. मयूर भाऊ कांबळे यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन सरपंच सोनाली मातेरे यांनी सांगितले की, “घोटावडे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून मुळशी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून घोटावडे उभारण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या स्वर्गीय आईचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.”
तसेच रामचंद्र मामा देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मुळशी तालुक्यात भारतीय जनता पार्टीला नंबर एकचा पक्ष करण्याचा आमचा निर्धार असून गावाचा व तालुक्याघोटावडेकास फक्त भाजपच्या माध्यमातूनच शक्य आहे.”
या प्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ कांबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सनस, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ जांगडे, अॅड. किशोरदादा अडसूळ, सचिव निखिल आढाळगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लखन गोळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वर्षाताई सातव, माजी सरपंच दत्ताभाऊ जाधव, भाग्यश्री देवकर, सारिकाताई खानेकर, सचिन धुमाळ, ज्ञानेश्वर साठे, गणेश सातव, बाळासाहेब खानेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























