जालना : आंदोलनकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याचा ‘फिल्मी स्टाईल’ लाथेचा धक्का, वादंग
जालन्यात उपोषण करणाऱ्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाला पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी नेले जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अटक दरम्यान अनंत कुलकर्णी नावाच्या एका पोलिस उपअधिकार्याने आंदोलनकर्त्याच्या कंबरड्यात ‘फिल्मी स्टाईल’ लाथ मारल्याची घटना समोर आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शांततेत आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला अशा प्रकारे वागणूक देणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या वाढत्या गैरवर्तनामुळे जनतेत नाराजीचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी होत आहे.
या घटनेमुळे पोलिस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























