Homeताज्या बातम्यासंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा भक्तिभावात संपन्न; ह.भ.प....

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा भक्तिभावात संपन्न; ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर
आळंदी, दि. १२ (प्रतिनिधी सचिन शिंदे)
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. “सर्व संतांचे समाधी सोहळे व पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्रित साजरी करावी” या स्तुत्य संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ कीर्तन ठरले. आपल्या निरूपणातून त्यांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत मुक्ताबाई, चांगदेव, बिभीषण आणि संत नामदेव महाराज यांच्या भक्तीचे विविध दाखले देत उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजविले. तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानाचे आध्यात्मिक महत्त्वही त्यांनी उलगडून सांगितले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी), वारकरी सेवा संघ (पुणे) आणि श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था (आळंदी) यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १४ वर्षे हा उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे. ह.भ.प. राजाभाऊ चोपदार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभरातील कीर्तनकार आणि वारकरी यांच्यासाठी प्रेरणास्थान बनला आहे.
कार्यक्रमात श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गायक, वादक आणि टाळकरी म्हणून मनःपूर्वक सेवा बजावली. ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, साहिल उत्तेकर, राज गोरे आणि पवन लिंगायत यांनी कीर्तनाला सुरेल साथ दिली.
कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वारकरी सेवा संघाच्या वतीने, “आळंदीप्रमाणेच सर्व संतांच्या देवस्थानांनी आपल्या परिसरात संतांच्या पुण्यतिथी आणि समाधी सोहळे एकत्रितपणे साजरे करून समाजात भक्ती, समता आणि ऐक्याचा संदेश द्यावा,” असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

Translate »
error: Content is protected !!