तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईला वेग मिळाला आहे.
माहितीनुसार, वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचला. त्यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
या कारवाईनंतर प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मानव मित्र न्यूज

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























