Homeताज्या बातम्याचाकणमध्ये बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघड; 42.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकणमध्ये बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघड; 42.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : अशोक कुंभार,)

चाकण परिसरात वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹42 लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील फिर्यादी कार विक्रीसाठी चाकण परिसरात आले होते. आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधत गाडी खरेदीची तयारी दर्शवली. दोन्ही बाजूंमध्ये ₹60 लाखांमध्ये व्यवहार निश्चित झाला.

व्यवहारानंतर आरोपींनी फिर्यादीला ₹3 लाख रोख रक्कम देऊन गाडी घेऊन पसार झाले. मात्र दिलेल्या पैशांची तपासणी केली असता वर-खाली खऱ्या नोटा आणि मध्ये पूर्णपणे बनावट नोटा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :

गणेश ज्ञानदेव ठाकरे

समीर दिनकर महल्ले

आरोपींकडून ₹42.50 लाखांच्या बनावट नोटा, फसवणुकीत वापरलेली अल्टो कार, एक मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चाकणमध्ये पुन्हा एकदा बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा आर्थिक गुन्हा उघडकीस आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

0
पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पीसीएमसी पाडण्याच्या मोहिमेनंतर, दोन कुदळवाडी धार्मिक वास्तू संरक्षण आणि नियमितीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल

0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कुदळवाडी येथील 11 अनधिकृत धार्मिक वास्तू जमीनदोस्त करण्याची मोहीम राबविण्यात आली. पुणे: कुदळवाडीतील दोन धार्मिक प्रतिष्ठानांचे व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त आणि...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

0
नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

दुबई कनेक्शनसह ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला; पिस्तूल, काडतुसे जप्त

0
पुणे : हडपसर आणि मुंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर येथील चार ठिकाणी छापे टाकले आणि कॉल सेंटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या...

सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींमध्ये हिंजवडी आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

0
कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दोन कर्मचाऱ्यांवरील आरोपांची दखल घेतली आहे आणि तथ्ये तपासत आहेत. पुणे : भोसरी पोलिसांनी हिंजवडी...

Translate »
error: Content is protected !!