Homeताज्या बातम्याआळंदीमध्ये बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

आळंदीमध्ये बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

आळंदी, दि. २५ (वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित करण्यात आलेला बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती वंदना जैन (अवर सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग), प्रशांत पोपट कुऱ्हाडे (नगराध्यक्ष), सुजाता तापकीर (उपनगराध्यक्षा), माधव खांडेकर (मुख्याधिकारी), संतोष शिंदे (माजी सदस्य), डॉ. आश्विनी गेतें (मनमुक्ता फाउंडेशन), भिमा नरके (पोलीस निरीक्षक), सोनाली झिंजुर्डे (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग) तसेच आळंदी नगरपरिषद येथील सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रास्ताविक करताना बाल हक्क संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश बहिरट आणि दत्तात्रय ढेंगळे यांनी उत्कृष्टरीत्या केले. पुनम गायकवाड आणि मुस्कान फाउंडेशनच्या टीमने प्रभावी पथनाट्याद्वारे बाल हक्कांविषयी जनजागृती केली.                                                         उस
कार्यक्रमादरम्यान श्रीमती वंदना जैन यांनी बाल हक्क संरक्षणाबाबत जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट केले. नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी आयोगाचे आभार मानून अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बाल हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. आश्विनी गेतें यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढवली, तर पुनम गायकवाड यांनी ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन वैशाली पाटील, अर्जुन घोडे, शशांक कदम, महेश घुंडरे, शशिकांत चव्हाण, शुभम कुऱ्हाडे, उद्धव मते, योगिता कुऱ्हाडे आणि जयश्री वाळुंज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा घुंडरे यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये बाल हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन संवेदनशीलता वाढेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!