Homeताज्या बातम्यापोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर ‘कचरा बंद’ आंदोलन तात्पुरते स्थलांतर...

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर ‘कचरा बंद’ आंदोलन तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे 

 ,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )

लोणी-काळभोर (पुणे) : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता अवैधरित्या टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘कचरा बंद’ आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांसाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत मध्यस्थी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, सात दिवसांत नदीपात्रात थेट कचरा टाकणे बंद न झाल्यास दोन्ही ग्रामपंचायतींच्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठातून प्रवेश दिला जाणार नाही.

या आंदोलनात एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर कॉलेज आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी नदी प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नदीपात्रातील कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीत चार दिवस धूर पसरला होता. त्यामुळे परिसरात विषारी धूर निर्माण होऊन काही विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘कचरा बंद’ आंदोलन सुरू केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

पिंपरी-चिंचवड हादरलं भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १६ राऊंड फायरिंग

0
,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ,) पिंपरी-चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड परिसरातील सवाना चौकात रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ता...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

Translate »
error: Content is protected !!