Homeताज्या बातम्याआळंदीत शुक्रवारी पूर्ववत पाणीपुरवठा बंद राहणार मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदीत शुक्रवारी पूर्ववत पाणीपुरवठा बंद राहणार मुख्याधिकारी माधव खांडेकर

(आळंदी.रवि कदम)
भामा–आसखेड कुरुळी प्रकल्पातील देखभाल दुरुस्तीचा परिणाम; पर्यायी पाणीपुरवठा यंत्रणा विकसित करण्याची जनहित फाउंडेशनची मागणी
आळंदी (प्रतिनिधी) : भामा–आसखेड कुरुळी प्रकल्पातील देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आळंदी शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवार (दि. १७) रात्री साडे अकरा वाजल्यापासून गुरुवार (दि. १८) रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.
भामा–आसखेड कुरुळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी नगरपरिषदेस याबाबत अधिकृत कळविले असून, प्रकल्पात विविध विकासात्मक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्रास पाणी मिळणार नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार (दि. १९) रोजी नियोजित वेळेनुसार आळंदी शहरात पूर्ववत पाणीपुरवठा सुरु होईल, असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी स्पष्ट केले. या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, आळंदी शहराला सध्या दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, भामा–आसखेड कुरुळी प्रकल्पातील देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. याचा थेट फटका नागरिकांना बसत असून, अनेक वेळा पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे आळंदी शहरासाठी कायमस्वरूपी पर्यायी पाणीपुरवठा यंत्रणा विकसित करण्याची गरज असल्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
जनहित फाउंडेशनने आळंदीतील पर्यायी जलस्रोतांचे संवर्धन करून वापरात आणण्याची मागणी केली आहे. शहरातील सुमारे ५० हून अधिक सार्वजनिक विंधन विहिरी केवळ देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहेत. या विंधन विहिरी दुरुस्त करून वापरण्यायोग्य यंत्रणा विकसित करून त्या सार्वजनिक वापरासाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, ज्या दिवशी शहरास पाणीपुरवठा होणार नाही, त्या दिवशी विंधन विहिरींसह थेट टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. यासाठी आळंदी शहरातील दहा प्रभागांसाठी प्रत्येकी एक अशा दहा पाण्याच्या टँकरची खरेदी करून तीर्थक्षेत्र आळंदीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे टँकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील निधी तसेच आळंदी यात्रा अनुदानातून थेट खरेदी करावेत, अशी सूचना जनहित फाउंडेशनने केली आहे.
या संदर्भात पुणे विभागीय आयुक्तांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीतून आळंदी, देहू, पंढरपूर यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये टँकर उपलब्ध करून देऊन भाविक व नागरिकांसाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था विकसित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या पर्यायी व्यवस्थेबाबत आळंदी नगरपरिषदेने नागरिकांना स्पष्टपणे आश्वस्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक भाडेकरू, कामगार व सामान्य नागरिकांकडे पाणी साठवणुकीची पुरेशी क्षमता नसल्याने पाणीपुरवठा खंडित झाल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा घटकांचा विचार करून प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने माउली मंदिर परिसरात व शहरातील विविध ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी केंद्रे विकसित करण्यात आली होती. मात्र सध्या मंदिर परिसरातील दोन ठिकाणची पाणीपुरवठा सेवा बंद असून, इतर ठिकाणीही देखभाल दुरुस्तीअभावी सुविधा बंद आहेत. देवस्थानने नैतिक जबाबदारी स्वीकारून पाच ठिकाणी पाणीपुरवठा सेवा सुरु करण्याचा ठराव करून कामकाज सुरु केले होते; मात्र प्रत्यक्षात सुविधा बंद असल्याने भाविक व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. माउली मंदिर परिसरासह शहरातील सर्व पाणीपुरवठा सेवा केंद्रे तातडीने पूर्ववत सुरु करण्याची मागणीही जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

0
मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

की कोंढवा जंक्शनवर खोदकामानंतर दुरूस्ती न झालेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती

0
खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

Translate »
error: Content is protected !!