पांगरे येथे दत्तजयंती उत्साहात साजरी
भजन-कीर्तनांनी गावात भक्तिमय वातावरण
पांगरे (ता. पुरंदर, जि. पुणे) – पांगरे गावातील कुंभारवाडा येथे दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी गुरुवारी दत्त जयंतीचा भव्य धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री अशोक जगन्नाथ कुंभार यांच्या वाड्यात आयोजित या कार्यक्रमामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. यात श्रीकांत जाधव व श्री प्रमोद खेनट या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकारांनी सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर श्री गोंदवलेकर महाराज भजनी ग्रुप यांनीही भावपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हेमंत प्रभू यांच्या गायनाला तबल्याची उत्कृष्ट साथ श्री अमित भांबुरे यांनी दिली. या प्रसंगी राजक्रॉप इयर्सचे मालक श्री नानासाहेब कामठे विशेष उपस्थित होते.
दुपारी ४ ते ६ या वेळेत दत्तजन्माचे कीर्तन श्री प्रशांत पुरंदरे महाराज यांनी भाविकांना अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव देणारे उत्कृष्ट असे कीर्तन केले. कार्यक्रमात थोर देणगीदारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माधव विठ्ठल काकडे यांनी उत्तमपणे पार पाडले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दत्तजयंती कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि यशस्वीरित्या पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























