Homeताज्या बातम्याआदिवासी आश्रमशाळेला 10 लाखांचा सिमेंट रस्ता – आमदार बबनराव लोणीकर यांची घोषणा

आदिवासी आश्रमशाळेला 10 लाखांचा सिमेंट रस्ता – आमदार बबनराव लोणीकर यांची घोषणा

परतूर (प्रतिनिधी गजानन राजबिंडे.पाटील)
परतूर येथील आदिवासी आश्रमशाळेला माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर 2025) भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण सुविधा, पिण्याचे पाणी, वसतिगृह, जेवण व्यवस्था यासह मूलभूत गरजांची त्यांनी सखोल पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांनंतर आमदार लोणीकर यांनी गटशिक्षणाधिकारी व जालना जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांशी संवाद साधून शाळेचा शिक्षण दर्जा उंचावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या भेटीचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कैलास बोराडे, संपत टकले, प्रकाश चव्हाण, शहाजी राक्षे, बंडू मानवतकर, एडवोकेट काळे तसेच अनेक भाजपा पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कैलास बोराडे यांच्याकडून दोन ए.आर.ओ. फिल्टरचे दान
मंठा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम राबवत दोन लाख रुपये किंमतीचे दोन ए.आर.ओ. फिल्टर शाळेला भेट दिले.
या फिल्टरचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
१० लाखांचा सिमेंट रस्ता – आमदार लोणीकरांचा निधी
शाळेकडे जाणाऱ्या अतिशय खराब अवस्थेतील रस्त्याची पाहणी केल्यानंतर आमदार लोणीकर यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून सिमेंट रस्ता करण्याची घोषणा केली.
लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शैक्षणिक व मूलभूत सुविधांची पाहणी
भेटीदरम्यान आमदार लोणीकर यांनी
विद्यार्थ्यांचे जेवण
शौचालये
स्वयंपाकगृह
अभ्यासिका
वसतिगृह
यांसह विविध सुविधांची तपासणी केली.
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!