Homeताज्या बातम्यासोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा – आळंदीत प्रेस दिनी तज्ज्ञांचे आवाहन ...

सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा – आळंदीत प्रेस दिनी तज्ज्ञांचे आवाहन प्रेस दिनानिमित्त आळंदीत विशेष कार्यक्रम;

आळंदी (रवि.कदम) : येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० (NEP) अनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विद्यार्थी समूह’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये समाज प्रबोधन करणे आणि माध्यमांच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे हे होते.
‘समाज माध्यम व प्रसिद्धी समूह’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षक समाधान मादक होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन मेदनकर, संदीप रंधवे, रोहिदास कदम, हमीद शेख, कृष्णाजी डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना संदीप रंधवे यांनी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा समतोल व योग्य पद्धतीने वापर करावा, अवांतर वाचनाची सवय लावावी असे आवाहन केले.
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी प्रेस दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजमाध्यमे ही केवळ मनोरंजनासाठी नसून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात, तसेच वाचन संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा वापर वाढवावा, वृत्तपत्रांचे वाचन करावे असे त्यांनी सांगितले.
रोहिदास कदम यांनी सोशल मीडियाच्या सदुपयोग व दुरुपयोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या माध्यमांचा वापर आवश्यक तेव्हाच आणि जबाबदारीने करावा, अन्यथा विद्यार्थी भरकटण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात श्रीम. के. एन. देवकर, जी. पी. पालवे, समाधान आदक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. के. एन. देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. पी. पालवे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींमध्ये हिंजवडी आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

0
कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दोन कर्मचाऱ्यांवरील आरोपांची दखल घेतली आहे आणि तथ्ये तपासत आहेत. पुणे : भोसरी पोलिसांनी हिंजवडी...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

0
पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

0
पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

Translate »
error: Content is protected !!