राजगुरुनगर ता कोयाळी येथे दरवर्षी पारंपरिक थाटात साजरा होणारा कोयाळी भानोबा यात्रा उत्सव यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात पार पडत आहे. महाराष्ट्रभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दूमदूमला आहे.
यात्रेची सुरुवात होताच गावात बैलगाडा शर्यत, भजन-भारुड, कुस्ती आखाडे, देव-दानव युद्ध अशा विविध पारंपरिक कार्यक्रमांनी उत्सवाला मंगलमय रंग भरत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या देव–दानव युद्धाचे प्रेक्षणीय सोहळे हा यात्रेचा मुख्य आकर्षण मानला जातो.
भाविकांनी देवाला नवस करून अर्पण केलेली सामग्रीचा भव्य लिलाव हा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात पार पडतो. नवसाला पावणारा देव भानोबा म्हणून भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा असून, आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत या भावनेने हजारो भाविक यात्रेदरम्यान दर्शन घेतात.
यात्रेतील कुस्ती आखाडे संपल्यानंतर भानो
बाची पालखी कुसेगावकडे प्रस्थान करते आणि त्यावेळी यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. परंपरा, अध्यात्म, श्रद्धा आणि लोककलांचा संगम घडवणारा हा सोहळा महाराष्ट्रातील नावाजलेल्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























