(पुणे–रवि.कदम )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री बावनकुळे.यांची महत्त्वपूर्ण घोषणा**
पुणे / छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्त्वाची पावले उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ते शिरूर, तसेच शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते धोरेगाव या महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
📌 पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प
एकूण लांबी : 53.4 किमी
6-लेन उन्नत (Elevated) रस्ता + 4-लेन At-Grade रस्ता
सुमारे 7.40 किमी भाग व्हाया-डुक्ट (Viaduct) स्वरूपात उभारण्यात येणार
या उन्नत मार्गाखाली–वर मेट्रोचा प्रस्तावित कॉरिडॉर असेल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत
या रस्त्यामुळे पुणे शहरातून शिरूरकडे जाणाऱ्या वाहनतळाला मोठा दिलासा मिळून औद्योगिक वाहतूकही सुकर होणार आहे.
📌 शेंद्रा – बिडकीन – धोरेगाव सहा-लेन महामार्ग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाचे दोन मार्गदेखील मंजूर करण्यात आले —
शेंद्रा (Industrial Estate) – बिडकीन (DMIC) : 32.8 किमी
बिडकीन – धोरेगाव : 26 किमी
दोन्ही रस्ते सहा-लेन रुंदीचे असून, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) मधील औद्योगिक वसाहतींना समृद्धी महामार्गाशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
📌 समृद्धी महामार्गाला थेट जोड
नवीन ग्रीनफील्ड रस्ता —
छत्रपती संभाजीनगर – जालना DMIC नोड (करमाड) – बिडकीन – समृद्धी महामार्ग
हा प्रकल्प मंजूर झाल्याने मराठवाड्यातील औद्योगिक वाढीस आणखी गती मिळणार आहे.
📌 तातडीने दुरुस्तीचे आदेश
सध्याचा छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर मार्ग अत्यंत खराब झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
📢 या निर्णयामुळे काय लाभ?
पुणे–शिरूर दरम्यान प्रवास वेळ लक्षणीय घट
वाहतूककोंडीला मोठा दिलासा
औद्योगिक वाहतूक आणि लॉजिस्टिक जलद
DMIC व समृद्धी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी
छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर परिसरातील रस्ते सुधारणा

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























