Homeताज्या बातम्याप्रामाणिकतेची नव्या नेतृत्वाची सुरुवात; निकिता धोत्रे नगराध्यक्ष पदाच्या मैदानात

प्रामाणिकतेची नव्या नेतृत्वाची सुरुवात; निकिता धोत्रे नगराध्यक्ष पदाच्या मैदानात

सासवड | प्रतिनिधी अशोक कुंभार
सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घोषणा करण्यात आली. समाजकार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले राजेंद्र धोत्रे यांनी आपल्या कन्या कुमारी निकिता राजेंद्र धोत्रे यांना यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. निकिता धोत्रे यांचे निवडणूक चिन्ह ‘कपबशी’ असून या घोषणेने सासवडच्या राजकीय वातावरणात नवी चर्चा रंगली आहे.
राजेंद्र धोत्रे यांनी सांगितले की, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आहे. “पहिल्यांदाच माझी मुलगी थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरते आहे, हे आमच्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी अभिमानाचे आहे. सासवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी निकिता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्यास कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले,
“मी अनेक वर्षे समाजकार्यात राहिलो. सासवड शहरातील प्रत्येक गल्ली-बोळातील लोकांच्या गरजा मला माहीत आहेत. त्याच जाणिवा आणि तळमळ निकितामध्येही आहे. शहर विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक निर्णयात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि नागरिकांचा सहभाग असायला हवा—हे तत्त्वज्ञान घेऊन ती निवडणुकीत उतरते आहे.”
धोत्रे यांनी सांगितले की, आगामी काळात पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, युवकांसाठी रोजगारसंधी, नागरिकांसाठी आधुनिक सुविधा, शहर नियोजन आणि शाश्वत विकास या प्रमुख मुद्द्यांवर निकिता धोत्रे विशेष काम करणार आहेत.
“सासवड शहर उज्वल, सुरक्षित आणि विकासमुखी बनवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू. यासाठी नागरिकांचा विश्वास आणि साथ अपरिहार्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नागरिकांना आवाहन करत राजेंद्र धोत्रे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले—
“सुजाण मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि युवकांनो… आपल्या आशीर्वादाशिवाय ही लढाई आम्हाला पूर्ण करता येणार नाही. कु. निकिता राजेंद्र धोत्रे यांना नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपला पूर्ण पाठिंबा द्या. तिचे निवडणूक चिन्ह ‘कपबशी’ असून या चिन्हासमोरील बटन दाबून तिला बहुमताने विजयी करा.”
या घोषणेनंतर शहरभर चर्चांना उधाण आले असून अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या निकिताला नागरिकांची कोणती प्रतिक्रिया

मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

Translate »
error: Content is protected !!