Homeताज्या बातम्यासासवड एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

सासवड एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
सासवड, दि. 31 मे 2026: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सासवड आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आज मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संजय महादेव जगदाळे (सहाय्यक कारागीर), बाळासाहेब तुकाराम झेंडे (चालक) आणि रामदास तुकाराम जगताप (चालक) यांचा समावेश होता. त्यांनी अनुक्रमे 35, 27 आणि 30 वर्षे एसटी सेवेत कार्य करत प्रवाशांची सेवा केली.
या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, दत्ताशेठ झुरंगे, माजी उपसभापती देविदास आप्पा कामठे, सासवड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार गिरमे, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, मुंबई विभाग नियंत्रक रणनवरे साहेब, आगार व्यवस्थापक मोहिनी ढेरे मॅडम, एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव मोहनराव जेधे, विभागीय अध्यक्ष दिलीपभाऊ परब, एसटी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विकास काकडे, संचालक सागर दिघे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच गरडे, बेलसर आणि नारायणपेठ येथील ग्रामस्थ, सरपंच, पदाधिकारी, प्रवासी आणि एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन एसटी कामगार संघटना, सासवड आगार यांच्या वतीने करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, सचिव महेश भोंगळे, कार्याध्यक्ष कैलास जगताप, माजी अध्यक्ष प्रवीण पोमण, माजी चेअरमन विनायक कामठे तसेच अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट जैनक यांनी केले. यावेळी सुरेश कडू, मोहनराव जेधे, संजय जगताप, गंगाराम जगदाळे, मंदार गिरमे, दत्ताशेठ झुरंगे, देविदास आप्पा कामठे, मोहिनी ढेरे मॅडम, आगार लेखाकार खोपडे मॅडम, बाळासाहेब भिंताडे यांनी मनोगत व्यक्त करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संजय जगदाळे यांनीही आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रवीण पोमण यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FYJC प्रथम कट ऑफ स्कोअर एसएससी कमी असूनही उच्च, लातूर कॉलेज सर्वसाधारण श्रेणीत 100%...

0
FYJC प्रवेश: संपूर्ण महाराष्ट्रात 95% आणि त्याहून अधिक कट ऑफ ब्रॅकेटमधील बहुतेक महाविद्यालयांमध्ये विज्ञान अभ्यासक्रमांचा समावेश होतो पुणे : शुक्रवारी जाहीर झालेल्या पहिल्या...

खर्चाचा दबाव आणि मान्सूनच्या चिंतेमध्ये ग्राहक टिकाऊ कंपन्या फेस्टिव्ह सीझन प्लेबुकवर पुनर्विचार करतात

0
प्रिमियम टेलिव्हिजन खरेदीदार, विशेषत: 55 इंच आणि त्याहून अधिक मोठ्या स्क्रीन खरेदी करणारे, वर्षभर खरेदी करत राहतात, असे उद्योग प्रतिनिधी म्हणतात पुणे :...

बोपदेव घाट बलात्कार पीडितेचे पुरावे रेकॉर्डिंग पूर्ण; कोर्टाने केसच्या दैनंदिन सुनावणीचे निर्देश दिले |...

0
11 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली पुणे : 3 ऑक्टोबर 2024 रोजी शहरातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि...

SPPU विद्यार्थ्यांना केंद्र-आधारित प्रवेश परीक्षा हव्या आहेत, तांत्रिक त्रुटी आणि निष्पक्षतेची चिंता सांगा |...

0
पुणे : 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर आणि पदवीपूर्व प्रवेश परीक्षा नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्याऐवजी पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावर सावित्रीबाई फुले...

नागरिकांच्या तक्रारींनंतर CEC सदस्य RFD साइट्सना भेट देतात पुणे बातम्या

0
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांनी पुण्यातील रिव्हरफॉन्ट प्रकल्पस्थळांना भेट दिली पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचे (CEC) सदस्य...

Translate »
error: Content is protected !!