Homeताज्या बातम्यासंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर RRC कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर RRC कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

घनसावंगी | प्रतिनिधी राहुल बोबडे
पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी (FRP) रकमेप्रकरणी प्रशासनाने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत. प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून जारी आदेशानुसार कारखान्याविरोधात महसूल वसुलीप्रमाणे (RRC) कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानदेव मुंढे तसेच रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सन 2025-26 हंगामातील ऊस बिलाची थकीत रक्कम 15 टक्के व्याजासह तात्काळ अदा करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
प्रशासनाच्या आदेशानुसार, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 49 लाख 27 हजार रुपये इतकी एफआरपी रक्कम थकीत आहे. संबंधित रकमेवर 15 टक्के व्याज देखील आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच कारखान्याने थकबाकी न भरल्यास कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या प्रक्रियेबाबत अधिकार देण्यात आले असून संबंधित मालमत्तेवर शासनाच्या नावाची नोंद घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ‌. ‌‌.

याशिवाय विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था (साखर) यांना ऊस पुरवठादारांची प्रमाणित यादी, तसेच कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने शेतकरी संघटनांना सुरू असलेले आंदोलन स्थगित करून कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, थकीत रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

Translate »
error: Content is protected !!