Homeताज्या बातम्याशौचालयाच्या नावाखाली बक्षीसपत्र; मारहाण-दमदाटीचा आरोप, महिला आयोगासह प्रशासनाकडे तक्रार

शौचालयाच्या नावाखाली बक्षीसपत्र; मारहाण-दमदाटीचा आरोप, महिला आयोगासह प्रशासनाकडे तक्रार

जमीन फसवणूक प्रकरणात मुलगा-सूनवर आरोप; त्रस्त वृद्ध दाम्पत्याची न्यायासाठी धडपड

बातमी सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)

पुरंदर तालुक्यातील मौजे वनपूरी (शेरीचा मळा) येथे एक धक्कादायक जमीन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध दाम्पत्य सौ. मालन मारुती कुंभारकर आणि मारुती सोपान कुंभारकर यांनी स्वतःच्या मुलगा, सून व नातवंडांविरोधात गंभीर आरोप करत विविध शासकीय विभागांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, मुलगा चंद्रकांत सोपान कुंभारकर, सून सत्यभामा चंद्रकांत कुंभारकर आणि दोन नातवंडांनी शौचालय बांधण्यास संमती घेण्याच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याला सासवड येथे नेले. त्यानंतर सर्व शेतजमीन बक्षीसपत्राद्वारे स्वतःच्या नावावर करून घेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मारुती कुंभारकर यांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी अर्ज दिले, मात्र न्याय मिळाला नसल्याने अखेर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र, न्यायालयात तारखेला हजर राहू नये यासाठी मुलगा-सून व नातवंडांकडून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

वृद्ध महिला सौ. मालन कुंभारकर यांनी राज्य महिला आयोग, मानवी हक्क आयोग, जिल्हाधिकारी पुणे, ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज सादर करून न्यायाची मागणी केली आहे.

तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, “संपूर्ण जमीन फसवणुकीने घेतल्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वयात आम्हाला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी सहन करावी लागत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे; मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी,” अशी भावनिक मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!