Homeताज्या बातम्यालग्नातील ‘व्हीआयपी’ स्वागत पद्धतीवर प्रश्नचिन्ह; पाहुण्यांच्या वेळेचा अनादर होत असल्याची नाराजी

लग्नातील ‘व्हीआयपी’ स्वागत पद्धतीवर प्रश्नचिन्ह; पाहुण्यांच्या वेळेचा अनादर होत असल्याची नाराजी

( पुरंदर सासवड प्रतिनिधी | अशोक कुंभार ,)

सध्या विवाह सोहळ्यांमध्ये काही मोजक्या प्रतिष्ठित, श्रीमंत किंवा राजकीय व्यक्तींचेच स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत वाढत असल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे. निमंत्रण देऊन सर्वांना बोलावले जाते; मात्र कार्यक्रमात फक्त काहींचाच सत्कार होत असल्याने इतर पाहुण्यांचा अप्रत्यक्षपणे अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, लग्नाच्या वेळेबाबतही पाहुण्यांच्या वेळेचा अनादर होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वेळा निमंत्रण पत्रिकेत संध्याकाळी ७ वाजता मुहूर्त दिला जातो; मात्र प्रत्यक्षात लग्न सोहळा रात्री ९ वाजता किंवा त्यानंतर सुरू होतो. त्यामुळे पाहुणे मंडळी एक-एक तास हॉलमध्ये बसून वाट पाहत असतात. वृद्ध, महिला, लहान मुले आणि दूरवरून आलेल्या पाहुण्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ⏰

विवाह सोहळ्यासाठी वेळ काढून आलेले नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधव हेही तेवढेच महत्त्वाचे असतात. विशेषतः आर्थिकदृष्ट्या साधारण असलेले पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणारे आप्तेष्ट दुर्लक्षित होत असल्याचे अनेकांचे मत आहे.

काही वेळा मोठे मान्यवर केवळ फेटा, पुष्पगुच्छ व फोटोसाठी येतात आणि पुढील कार्यक्रमाचे कारण देत जेवण न करता निघून जातात. त्यामुळे लग्नातील अन्नाचा अपमान होतो तसेच उपस्थित राहिलेल्या इतर पाहुण्यांमध्ये नाराजी निर्माण होते, अशीही टीका होत आहे.

त्याऐवजी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित सर्व पाहुण्यांचे एकत्रित स्वागत करून विवाह विधी नियोजित वेळेत पार पाडावेत, अशी सूचना नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्यांचा स्वतंत्र सत्कार झाला नाही म्हणून नाराज होण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

ही ‘व्हीआयपी स्वागत’ पद्धत बंद करून सर्व पाहुण्यांना समान सन्मान देण्याची मागणी आता समाजातून जोर धरू लागली आहे. 🤝

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा...

0
आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज...

Translate »
error: Content is protected !!