सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार / राज्य परिवहन महामंडळाच्या सासवड आगारामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, सासवड शहर शाखा यांच्या वतीने चालक व वाहकांसाठी सुरक्षित बस चालविण्याबाबत सविस्तर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम निलीमा दिदी व आशा दिदी यांनी चालक व वाहकांना मार्गदर्शन करताना, मन:स्वास्थ्य राखून, एकाग्रतेने व तणावमुक्त अवस्थेत बस कशी चालवावी, याबाबत सखोल माहिती दिली. वाहन चालविणारा इतर विचारांपासून दूर राहून संपूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानक प्रमुख मोहिनी ढेरे यांनी निलीमा दिदी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर आगार लेखापाल मनीषा भोईटे यांनी आशा दिदी यांचे स्वागत केले.
यावेळी आगार प्रमुख सागर गाडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास आगार सहायक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढेरे, कनिष्ठ सहाय्यक लक्ष्मी गायकवाड, रुपाली गिरमे, सुजाता भागवत, कार्यशाळेचे इलेक्ट्रिसिटी पोमण, तसेच कार्यशाळा कर्मचारी, चालक-वाहक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक श्री. पोपट जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्थानक प्रमुख मोहिनी ढेरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सुरक्षित सेवा व विना अपघात प्रवास यासाठी मार्गदर्शन करत निलीमा दिदी यांनी मनःशांतीसाठी छोट्या पुस्तिकांचे वाटप केले. या प्रेरणादायी उपक्रमाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























